जसं तुला त्याचं असताना, माझं होणं जमलं नाही, तसंच | मराठी Poetry

"जसं तुला त्याचं असताना, माझं होणं जमलं नाही, तसंच तू त्याची झाल्यावर, तुझ्यात मन रमलं नाही... तू कसं म्हणतेस तुला तुझ्या शहराने फक्तं प्रेम दिलं, एक एक जागा सांगत होती, माझ्याविन तुला करमलं नाही... एक हृदय होतं अन् ते ही आजन्म तुला दिलं मी, इतक्या वर्षांत जे कुणापुढे कधी नमलं नाही... मी आतून इतका अशांत या आधी कधी नव्हतो गं, मला विसरशील कसं, हे वादळ अजून शमलं नाही... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar"

 जसं तुला त्याचं असताना, माझं होणं जमलं नाही,
तसंच तू त्याची झाल्यावर, तुझ्यात मन रमलं नाही...

तू कसं म्हणतेस तुला तुझ्या शहराने फक्तं प्रेम दिलं,
एक एक जागा सांगत होती, माझ्याविन तुला करमलं नाही...

एक हृदय होतं अन् ते ही आजन्म तुला दिलं मी,
इतक्या वर्षांत जे कुणापुढे कधी नमलं नाही...

मी आतून इतका अशांत या आधी कधी नव्हतो गं,
मला विसरशील कसं, हे वादळ अजून शमलं नाही...

स्वप्नील हुद्दार











.

©Swapnil Huddar

जसं तुला त्याचं असताना, माझं होणं जमलं नाही, तसंच तू त्याची झाल्यावर, तुझ्यात मन रमलं नाही... तू कसं म्हणतेस तुला तुझ्या शहराने फक्तं प्रेम दिलं, एक एक जागा सांगत होती, माझ्याविन तुला करमलं नाही... एक हृदय होतं अन् ते ही आजन्म तुला दिलं मी, इतक्या वर्षांत जे कुणापुढे कधी नमलं नाही... मी आतून इतका अशांत या आधी कधी नव्हतो गं, मला विसरशील कसं, हे वादळ अजून शमलं नाही... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#GoodNight

People who shared love close

More like this

Trending Topic