मला नाही तक्रार माझ्या आयुष्याशी
मिळालं ते जगण्यासाठी खूप आहे
सुख हिरावण्यासाठी नको मला अजून काही
आहे त्यातच मी खूप खुश आहे...
चालतं फिरत सुदृढ शरीर दिलं
त्याहून किंमती आयुष्यात काय आहे
महत्वाचे सुंदर अवयव दिलं शरीराला
याहून मोठी भेट आयुष्यात काय आहे...
समजून घेणारं मन मिळालं
व्यक्त व्हायला भावना दिली आहे
हसण्यारडण्यासाठी मित्र, परिवार मिळाला
त्यांना जपण्यासाठी नाती दिली आहे...
अपेक्षेप्रमाणे येतात काही क्षण दुःखाचे
पण सुख ही तसे भरभरून दिले आहे
कशाला करू मी मोह आणखी
जगण्यासाठी हवं ते सगळं दिलं आहे...
दुःख येण्याचे स्वार्थ,मोह खरे कारण
मला समाधानी मन दिले आहे
अजून काय हवं सुखी आनंदी राहण्यासाठी
देवाने मला हवं ते सगळं दिलं आहे...
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
best motivational thoughts motivational story in hindi