White जाणता अजाणता
दुखावले तुला...
तरीही खुप मायेने
जोपासतोस मला...
कैक वाटा चाललो
सोडूनीया तुला...
न बोलता काही
साथ देतोस मला...
कधीच नाही...
समजून घेतले तुला...
हरतो जेव्हा कधी
सावरतोस मला...
हरवल्यावर केव्हा
शोधतो तुला...
निरागस हास्यात
सापडतोस मला...
असं कितीदा घडावं
की नुसतचं उरावं
तुझ्याशिवाय तुला...
माझ्याशिवाय मला...
ओळखणार भेटावं
जाऊ दे सोड...
श्वास अन निश्वास
दोघातील अंतर...
तुझं माझं करण्यात
दोघेही खर्चून टाकतो...
-प्रविण पावडे
©Pravin Pawade
#sad_qoute