प्रेमात जग दिसते गोड
गुलाबी गुलाबासारखं
नाही भेटलं तर भासे
टोचणाऱ्या काट्यासारखं,
जीवन असते पानावर
तरंगणाऱ्या दवासारखं
सांभाळले तरी हातून
सुटणाऱ्या क्षणासारखं,
आयुष्य जगायचं असते
ते त्या निस्वार्थ फुलांसारखं,
मरण मात्र असते न पचवता
येणाऱ्या अटळ सत्यासारखं,
आईवडिलांची सेवा हेच
जिवंतपणात देव दर्शनासारखं
त्यांच्याविना आयुष्य म्हणजे
पर्णहीन अर्थहीन खोडासारखं,
©विवेक मोकळ
#आयुष्य
प्रेमात जग दिसते गोड
गुलाबी गुलाबासारखं
नाही भेटलं तर भासे
टोचणाऱ्या काट्यासारखं,
जीवन असते पानावर