White मागणं काही नाही बाप्पा तुला
फक्त प्रयत्नांना माझ्या साथ दे
प्रामाणिकपणे शोधतोय मी रस्ता माझा
फक्त निंदकांना जळणाऱ्यांना तेवढं मात दे...
मागणं काही नाही बाप्पा तुला
हतबल होऊन थांबलेल्यांना पळ दे
पार होईल प्रत्येक कठीण रस्ता
फक्त विरोधकांना तेवढं बळ दे...
फार काही नको बाप्पा तुझ्याकडून
सगळ्यांना सुखाचा समाधानाचा वर दे
माणूस म्हणून माणसाला जगण्यासाठी
तूझ्या पद्धतीने फक्त धीर दे...
अजून काय मागायचं बाप्पा तुला
तिरस्कार करणारे भरपूर आहेत त्यांना थोडं संयम दे
आणि विरहाच्या दुःखात जगणाऱ्यांना
त्यांच्या वाट्याचं त्यांना हवं असलेलं खरं प्रेम दे...
©कधी प्रेम कधी विरह
#Ganesh_chaturthi