वाहत्या पाण्यात फिरतो गरगरा आहे
जन्म माझाही क्षणाचा भोवरा आहे
फार थकले हे असे बोलू नका कोणी
बाप माझा एक ताजा मोगरा आहे
तू दिला आधार ओठी गोड ओठांचा
याहुनी मोठा कशाचा हादरा आहे
घेउनी बसला विचारांची तिजोरी अन्
नेमका चोरीस गेला चेहरा आहे
जिंकली आकाशगंगा तू जरी होती
कोणत्या विवरात आता मकबरा आहे
हा तुझा मानू नको मुक्काम कायमचा
सोयरा आहे तू येथे सोयरा आहे
सतीश देशमुख
शेंबाळपिंप्री, ता. पुसद जि. यवतमाळ
मोबाईल नंबर ७०३८२६७५७६
©Satish Deshmukh
#Friend भोवरा