sunset nature उदास या सांजवेळी मुक्या झाल्या भिंती
गर्दीत असणाऱ्या मनाला विरहाची भीती
ओघळणारे ते अश्रु दिसुच नयेत कोणा
ओठांना मग अश्रु लपवून हसण्याची सक्ती
होईल पहाट, जाईल तो अंधार दूर
डोळ्यांना ही त्या वेड्या आशेची आसक्ती
तुझ्या मोहात मी , तुझ्या बोलण्यात मी
मनात ही कुठली तुझी आंधळी भक्ती
दहा खोट्यांमागे एक खरे लपावे
ही बोलण्याची जगाची कोणती उक्ती
नाराज मी,उदास मी , सैरभैर मनाची वेदना
अलगद उतरती कागदावर व्याकूळ त्या पंक्ती
गोड तुझ्या बोलण्यात विरघळली ही अशी काही' मी
उरलीच आहे कुठे मी वेगळी व्यक्ती
©Ashvini Patil
#sunsetnature