कधी कधी काही स्वप्न मोडलेलेच बरे
मनातल्या गाठी लवकर सोडलेलेच बरे
नको पुढे त्रास आयुष्यात अधुऱ्या स्वप्नांचा
म्हणून जोडन्याआधीच मन तोडलेलंच बरे...
होतील यातना थोड्याफार माघार घेताना
पण पुढे जाण्याआधीच रस्ता मोडलेलंच बरे
नको पूर्ण न होणारे यातना देणारे स्वप्न भरदिवसा बघणं
एकतर कायमचंच झोपलेलं बरे...
नसेल जेव्हा मनाचा ठाम निश्चय हात पकडण्याचा
आधीच म्हणून ते हात सोडलेलं बरे
पुढे नको बहाणे,नको कारणे दुःखाचे
म्हणून समोर येण्याआधी पाठ फिरवलेलं बरे...
काही क्षणांची सोबत कशाला
बाकी दुःख एकट्याच्या आयुष्यात
म्हणून आधीच थोडे दुःख भोगलेलं बरे
नको वाद,नको शंका पण मुकाट्यानं शांततेत दोष न देत
नात्यातील बांधलेल्या गाठी कायमचे सोडलेलं बरे....
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
#happypromiseday मराठी प्रेम कविता