१००%
माझे माझे करता करता धडपडलो मी शंभर टक्के!
काही हाती उरले नाही अवघडलो मी शंभर टक्के!!
तळहाताच्या फोडावाणी जपले ज्यांना माझे म्हणुनी!
अडगळ झालो आज तयांना तडफडलो मी शंभर टक्के!!
शब्द कधीही पडला नाही आदेश असो की सुचना ती!
सहकारीही ओळख भुलले चरफडलो मी शंभर टक्के!!
कित्येकांच्या कामी आलो सांगू आता कोणा कोणा?
उठता बसता झोपेमध्ये बडबडलो मी शंभर टक्के!!
म्हणती कोणी कर्माचाही लेखाजोखा असतो सारा!
झाला नाही न्यायनिवाडा रडरडलो मी शंभर टक्के!
जयराम धोंगडे, नांदेड
©Jairam Dhongade
#nirasha