#माझ्या सावळ्या विठ्ठला....
शब्दवेडा किशोर
बोल अमृताचे आज आले बघ ओठी
जमला सारा वैष्णवांचा मेळा इंद्रायणी काठी
राहिला उभा तो अद्भुत बघा हरीनामाचा
आसमंती दुमदुमे गजर मग आपसूक टाळ मृदंगाचा
चालले वारकरी बघा आज
सावळ्या त्या विठुरायाच्या पंढरीला
डोळा भरून पाहती मग त्या जगाच्या कैवारी विटेवरी
अठ्ठावीस युगं उभा असलेल्या पांडुरंगाला
वारीत चालताना आस लागे बा विठ्ठला
तुझ्या दर्शनाची हरेक वारकऱ्यला
दर्शन होता मग आपसूक भूल पडे
तुझ्या विश्वव्यापक रूपाची जीवाला
©शब्दवेडा किशोर
#विठ्ठल_विठ्ठल