अजूनही मला कळत नाही
तू अशी का वागतेस..?
माझी प्रत्येक गोष्ट तुझी असूनही
तू माझ्याकडे का मागतेस...?
इतके ओळखीचे असूनही
तू इतकी का लाजतेस..?
लाजताना खळी मध्ये
मात्र लाजवाब दिसतेस..
परकी असून सुध्धा मला
तू जवळची का भासतेस ..?
खरं सांग प्रिये मला
माझ्यावर किती प्रेम करतेस..?
©गोरक्ष अशोक उंबरकर
दूर दूर का पळते स