White
जीवमात्र हे जन्मती इथे भोगण्या भोग
देह मिळाला मानवी हा दुर्लभ संयोग
कर्म करावे चांगले असो अंतरी भाव
कधी नसावे अंतरी स्वार्थ अहंता हाव
मानव होतो आंधळा स्वार्थ वाढता फार
पूर्ण कराया वासना करतो मग अविचार
अविचाराने नासते कृती वाढतो राग
फणा काढुनी डोलतो मग द्वेषाचा नाग
नको व्हायला वासना मनातल्या शिरजोर
उपाय गेले सांगुनी संत महात्मे थोर
अश्व मनाचा साधण्या जरा धिराने वाग
प्रेम खरे घे जाणुनी कर थोडा तू त्याग
ठेव मनी तू जागता अखंड भक्ती भाव
अहंकार दे सोडुनी नको फुकाचा आव
कृतज्ञतेची भावना मनी नेहमी ठेव
ओळख आता माणसा अंतरातला देव
©जितू
#rajdhani_night