लेक वाचवा...
मी तर आहे वेलीची एक कळी,
नका तोडून टाकू उमलण्याआधी फुलाची पाकळी.
मुला मुलीत नका ना करू भेद,
अजूनही विचार बदलत नाहीत हाच एक मनी खेद.
बाबा मी तर आहे ना तुमची लेक,
मग का जाऊन करता मला दवाखान्यांमध्ये चेक.
माझ्याही असतात काही आशा,
का वाट्याला येतात माझ्याच फक्त मग निराशा.
आई बाबा करा ना माझाही विचार,
देऊ नव्या जीवास एक वेगळा आकार.
मला समजू नका हो तुमचा भार,
मी ही होईन तुमचा नक्की उद्याचा आधार.
मी तर आहे ना तुमची मुलगी,
मग नका ना करू जगात येण्याआधीच माझी चुगली.
मलाही द्या माझ्या जन्माचा अधिकार,
मी ही उद्या प्रगतीचे स्वप्न करीन तुमचे साकार.
सारे जग म्हणते लेक वाचवा लेक वाचवा,
असाच डंका घरोघरी घुमूनी साऱ्यांच्या मनात तो पेरावा.
©Mayuri Bhosale
लेक वाचवा