आभाळाच्या गर्दीतून वाट काढत,
परतीच्या प्रवासाला निघालेल्या सूर्याला कुणी अडवू शकत नाही...
त्याने ठरवलं असतं जायचं,
ठराविक वेळी, ठराविक गर्दी टाळून कुठेतरी पल्याड निघून जायचं
आणि पुन्हा परतताना मात्र अगदी कोरं, शून्य होऊन यायचं...
असंच ठराविक वेळी, असंख्य साचलेल्या विचारांच्या गर्दीतून
दूर जाणं आणि पुन्हा भानावर आलोच की आधीचं काहीच सोबत न आणणं...
आपल्याला ही जमायला हवं ना ?
त्या सूर्याकडून किमान हे तरी शिकायला हवं ना ?
स्वप्नील हुद्दार
.
©Swapnil Huddar
#SunSet