देश जळतोय जळूद्या
खरं कोण खोटं कोण
हे एकदाच कळूद्या
देश जळतोय जळूद्या ....
देशभक्त आणि देशद्रोही
सामना चालू आहे
सामना त्यांचा चालूद्या
एकमेकाला गोळ्या घालतील
गोळ्या त्यांना घालूद्या
तुमचं आमचं काम नाही
त्यांचं त्यांना करुद्या
दंगली घडवून हकनाक मरतील
मरणाऱ्याना मरुद्या ...
काही मरतील काही पळतील
पळणाऱ्याना पळूद्या ...
देश जळतोय जळूद्या
खरं कोण खोटं कोण
हे एकदाच कळूद्या
जाती जातीत काड्या करतील
करणाऱ्यांना करूद्या
खोटं बोलून वेठीस धरतील
धरणाऱ्याना धरूद्या
घरं जळतील, गाड्या जाळतील
जाळणाऱ्याना जाळूद्या
उगाच रडतील शोक पाळतील
पाळणाऱ्याना पाळूद्या
तुम्ही यातून लांबच रहा
उगाच ते तुम्हाला छळतील
छळनाऱ्याना छळूद्या...
देश जळतोय जळूद्या
खरं कोण खोटं कोण
हे एकदाच कळूद्या
कडवे येतील, भडवे येतील
मुल्ला, मौलवी, बडवे येतील
येणाऱ्याना येऊद्या...
चिथावणीखोर भाषणं देतील
देणाऱ्यांना देऊद्या ..
एकाल तर देशभक्त
बोलाल तर देशद्रोही
बोलणाऱ्याना बोलूद्या
सहनशक्तीत भक्ती तोलतील
तोलनाऱ्यांना तोलूद्या
तुम्ही देशभक्त की देशद्रोही
त्यांचं त्यांना कळुद्या
देश जळतोय जळूद्या
खरं कोण खोटं कोण
हे एकदाच कळूद्या
अनिल सपकाळ
८८७९१३८६८६
#Desh_ke_liye