White तुला पुढ्यात पाहण्याची एक आस लावून बसलो आहे,
तुझ्यासोबत जगण्यासाठी एक श्वास ठेवून बसलो आहे...
कसे उसवत गेले हे आपल्यामधले बंध इतके,
माझ्या तावडीत उरलेले क्षण मिच शिवून बसलो आहे...
तुला कसा जमतो आपल्या दोघांत खेळ लपाछपीचा,
तुला शोधण्यासाठी स्वतःवर राज्य घेऊन बसलो आहे...
तसा एकदा यमाने धाडला होता सांगावा माझ्यासाठी,
'उद्या येतो रे' असे त्यालाही आश्वासन देऊन बसलो आहे...
तू कुठे असतेस, काय करतेस, हे कळेनासे झाले असता,
जिथे मला सोडले होतेस त्या जागी येऊन बसलो आहे...
स्वप्नील हुद्दार
.
©Swapnil Huddar
#love_shayari