White ती :
इतका विरह का लिहितोस ??
कुणाची आठवण जाळण्यासाठी की
कुणाचं मन पुन्हा चाळण्यासाठी...
मी :
आता नाही इच्छा काही, स्वतःचं मागण्यासाठी,
खूप आहे उराशी दुःख, आयुष्य झाकण्यासाठी,
फक्त एखादी कविता कागदावरली, वाचणाऱ्यासाठी,
अख्खा काळ असतात माझे शब्द, भोगणाऱ्यासाठी,
कुठेतरी वाटत असावं मी सोसलेलं आहे सेम ज्यांचं,
लिहितो त्यांच्यासाठी ज्यांना मिळालं नाही प्रेम त्यांचं...
स्वप्नील हुद्दार
.
©Swapnil Huddar
#love_shayari