White आयुष्यात खरं प्रेम मिळायला भाग्य लागतं
प्रत्येकांच्या नशिबात ते नसतं
ज्यांच्या नशिबात मिळालं खरं प्रेम
त्यांना त्याचं महत्व लवकर कळत नसतं...
वेळ निघून गेलेली असते ती
जेव्हा खऱ्या प्रेमाचं महत्व कळतं
जेव्हा समजायला लागतं दूर गेलेला माणूस
तेव्हाच मात्र ते आपल्या जवळ नसतं..
वस्तू असो किंवा व्यक्ती आपल्याजवळ
त्याचं मोल आपल्या आयुष्यात तेव्हा काहीच नसतं
हा मात्र सवय लावून दूर निघून गेलेली व्यक्ती
पुन्हा मिळवणं फारच कठीण असतं...
वेळ हातात असते तेव्हा जपणं फार महत्वाचं
तेव्हा मिळवण्यासाठी लढणं गरजेचं असतं
जर निघून गेली व्यक्ती आयुष्यातून कायमची
तेव्हा हातात मात्र काहीच उरत नसतं...
आयुष्यात एकदाच मिळते संधी कोणतीही
त्या संधीला सहज गमवायचं नसतं
मिळालेल्या संधीचे सोने करणं आपल्या हातात असतं
ते मिळवण्यासाठी मनात जिद्द, बळ आणि प्रेम फार असावं लागतं...
©कधी प्रेम कधी विरह
#moon_day