White इथे तिथे फिरून तुला, शोधते मी साऱ्यात आहे,
कुणीतरी सांगत होतं, तू तुटणाऱ्या ताऱ्यात आहे...
तुझ्यानंतर मी कशी जगतेय हे कळतंय का तुला ?
एक सुकलेलं फुल जसं, बहरलेल्या हारात आहे...
तुला मागायला मला, तुझ्याकडेच यावं लागेल,
गेल्यावरही चोख असा, तू व्यवहारात आहे...
आज ठरविले मी, तुला उद्यापासून आठवायचे नाही,
कठीण आहे ना हे, तू येणाऱ्या प्रत्येक वारात आहे...
तुझ्या साऱ्या आठवणी मिटवून टाकू ठरवल्यावर,
नेमकी शेवटची एखादी, घुटमळते दारात आहे...
स्वप्नील हुद्दार
.
©Swapnil Huddar
#Sad_Status