पंढरीचा राणा माझा देव तु विठ्ठल.... शब्दवेडा किशोर | मराठी कविता

"पंढरीचा राणा माझा देव तु विठ्ठल.... शब्दवेडा किशोर होईन भिकारी मी पंढरीचा वारकरी वारी चुकू न दे तू हरी छंद लागला मज त्या श्रीहरी विठ्ठलभक्तीचा जन्मोजन्मी दास होईल त्या श्रीहरी विठ्ठलाचा ||१|| माझ्या विठोबाचा कैसा हा प्रेमभाव खोट्या भक्तीस नसे तया चरणी वाव माझ्या विठोबाचे रूप ते खुप साजीरे तयामुळे लाभती आम्हास सप्तरंग हे आयुष्याचे गोजीरे ||२|| नाही सोडणार कदापी कधी मी तयाचे चरण तयाचरणी विरुनी जाता होईल माझ्या जन्माचं सोनं तयाकृपेमुळेच आहे मजजवळी हे माझ्या श्वासाचं धन तयाच्या दर्शनमात्रे होतसे मन माझे सदा पावन ||३|| जन्म दिलासी आम्हा तु आमच्या बा विठ्ठला तूच आमचा असशी पाठीराखा तूच आमचा बंधू सखा गुरु अन् धर्म अंतसमयीदेखील तुझ्याच चरणी दे विसावा तु आम्हाला ||४|| ©शब्दवेडा किशोर"

 पंढरीचा राणा माझा देव तु विठ्ठल....
शब्दवेडा किशोर 
होईन भिकारी मी पंढरीचा वारकरी
वारी चुकू न दे तू हरी
छंद लागला मज त्या श्रीहरी विठ्ठलभक्तीचा 
जन्मोजन्मी दास होईल त्या श्रीहरी विठ्ठलाचा   ||१||
माझ्या विठोबाचा कैसा हा प्रेमभाव
खोट्या भक्तीस नसे तया चरणी वाव
माझ्या विठोबाचे रूप ते खुप साजीरे
तयामुळे लाभती आम्हास सप्तरंग हे आयुष्याचे गोजीरे  ||२||
नाही सोडणार कदापी कधी मी तयाचे चरण
तयाचरणी विरुनी जाता होईल माझ्या जन्माचं सोनं
तयाकृपेमुळेच आहे मजजवळी हे माझ्या श्वासाचं धन
तयाच्या दर्शनमात्रे होतसे मन माझे सदा पावन  ||३||
जन्म दिलासी आम्हा तु आमच्या बा विठ्ठला
तूच आमचा असशी पाठीराखा 
तूच आमचा बंधू सखा गुरु अन् धर्म 
अंतसमयीदेखील तुझ्याच चरणी दे विसावा तु आम्हाला   ||४||

©शब्दवेडा किशोर

पंढरीचा राणा माझा देव तु विठ्ठल.... शब्दवेडा किशोर होईन भिकारी मी पंढरीचा वारकरी वारी चुकू न दे तू हरी छंद लागला मज त्या श्रीहरी विठ्ठलभक्तीचा जन्मोजन्मी दास होईल त्या श्रीहरी विठ्ठलाचा ||१|| माझ्या विठोबाचा कैसा हा प्रेमभाव खोट्या भक्तीस नसे तया चरणी वाव माझ्या विठोबाचे रूप ते खुप साजीरे तयामुळे लाभती आम्हास सप्तरंग हे आयुष्याचे गोजीरे ||२|| नाही सोडणार कदापी कधी मी तयाचे चरण तयाचरणी विरुनी जाता होईल माझ्या जन्माचं सोनं तयाकृपेमुळेच आहे मजजवळी हे माझ्या श्वासाचं धन तयाच्या दर्शनमात्रे होतसे मन माझे सदा पावन ||३|| जन्म दिलासी आम्हा तु आमच्या बा विठ्ठला तूच आमचा असशी पाठीराखा तूच आमचा बंधू सखा गुरु अन् धर्म अंतसमयीदेखील तुझ्याच चरणी दे विसावा तु आम्हाला ||४|| ©शब्दवेडा किशोर

#vitthalbhakti मराठी कविता

People who shared love close

More like this

Trending Topic