New Year 2024-25 सरत्या वर्षाला काय द्यावा निरोप
केलेल्या चुकांना कटाक्षाने टाळून
आनंदी क्षणांना हृदयात माळून
दुःखद क्षणांना सहज गिळून
सरत्या वर्षाला निरोप देऊ सर्व मिळून..
नवीन वर्षाचा काय करावा संकल्प
अहंकार, धर्मजाती भेदाला जाळून
माणुस म्हणुन जगण्याच्या सर्व मर्यादा पाळून
आयुष्याच्या पुस्तकाला नव्याने चाळून
नवीन वर्षाचे स्वागत करुया सर्व मिळून..
शब्दांकन ✍️@भुषण ठाकरे
©Bhushan Thakare
#Newyear2024-25