White मैत्री 👭
मैत्री हा शब्द बरच सांगून जातो मनी, 💁
पाने, फुले ,झाडे सारे एकत्र मिळे जसे वनी. 🪻🌹🌴
असे त्यात नात्यांचा एक गोड आस्वाद, 🙂
ते नाते टिकवताना घ्यावी लागते सगळ्यांचीच दाद. 🤝
हा एक सुंदर आयुष्यातील प्रवास, 🛣️
सगळ्यांसाठी असतो तो क्षणच खास.🎊🎉
शब्द नसे पुरेसे असा हा रेशमी बंध,🎀
मातीमध्ये दरवळतो मोहक सुगंध.🤗
येथील बरेच मध्ये काटे आणि कुटे, 🤼⚔️
तरीही तोडू फोडू नकोस त्याला तू फाटे. 🙅
किती सहज सोपे आणि सरळ या नात्याच्या वाटा, 🛤️
दूर पसरती वाऱ्या संगे समुद्राच्या जशा लाटा. 🌊
सोप्या भाषेत सांगायचे तर मैत्री ही मैत्री असते, 👭
त्या नात्यात कोणतीच अट नसते.🙅
नको नजर लागावी कुणाचीच या सुंदर नात्याला, 🧿
जन्मोजन्मी ही सर्वांना मिळून जाऊ देत ती पुढे अनंताला.🙏
©Mayuri Bhosale
#मैत्री