लेकरांच्या खेळण्यातील बनते ती बाहुली
निल्या सावळ्या आभाळाची बनते ती सावली
दिवसभर यंत्रासारखी राबत असते सतत
अंधार झाल्यावर दिव्या वरळी पायली बनते आई
थकलेल्या पाख्रांसाठी घरट बनते आई
आई असे पहिला संस्कार
तोल जाणाऱ्या लेकराचा
हक्काचा तो आधार
आई टिकवे सार घर
आई घडवते घर
आई घराचा मांगल्य
आई चेतन्याचा स्वर
आईच्या मायेची सर जगात या नाही
सतत साऱ्याना माया ती देत राही
आई लाभे ज्याला त्याच्या गाठी
असे जन्माची पुण्याई
आई विना पोरका जो असे
त्याची माय माझी विठाई
नाही होऊ शकत आपण ऋणमुक्त
नाही फेडू शकत तिचे आपण पांग
तिच्या मायेचा हात सतत डोक्यावर असावा
आई आहे पहिला संस्कार
लेकराच्या तोंडातील पहिला उच्चार
©Monika
#आई