White **दृष्टी**
"हे देवा, थोडीशी जरी मज अंधुक दृष्टी दिली असतीस......
सुंदर तुझ्या या सृष्टीचे सौंदर्य मीही निहारले असते,
रानावनात उमलेल्या फुलांना मीही परखले असते,
उंच उंच डोंगराच्या रांगांना, आकाशात उंच भरारी
मारणाऱ्या पाखरांना मीही पाहिले असते....
थोडा सा जरी मज अंधुक प्रकाश दिला असतास.....
विशाल अशा या सागराचे, झुळझुळ वाहणाऱ्या
नदीचे सौंदर्य मीही पापण्यात सामावले असते
धो धो पडणाऱ्या पावसात टप टप पडणाऱ्या
गारांना मीही वेचले असते
इंद्रधनुच्या रंगात थोडी तरी मीही रंगले असते ,
थोडासा जरी मज अंधुक प्रकाश दिला असतास...
हे देवा, थोडीशी जरी मज अंधुक दृष्टी दिली असतीस....."
************************
सौ. सुधा सुधीर बेटगेरी
(बागलकोट)
©Sudha Betageri
#Sudha