स्वर लता
खरोखर दीदी
भाग्यवंत आम्ही
दिधला सुरांचा
प्रसाद तो तुम्ही १
स्वरांची देवता
लता दीदी आहे
गांधार आपुला
अंतरास मोहे. २
असह्य कल्पना
नाही करवत
दिदिंच्या अभावी
सारे शुन्यवत. ३
कलेची साधना
केली खडतर
स्वरांची साधना
त्यांची निरंतर ३
दिनानाथ कन्या
गळा तिचा गोड
अखंड रियाज
त्रिलोकी अजोड ४
हे मेरे वतन
गाणे ते अमर
डोळे पाणावती
ऐकुनी ते स्वर. ५
शब्द आज स्तब्ध
भास्कर थांबला
आसवे गोठली
नाद हरवला. ६
शोधू आता कुठे
स्वर्गीय आवाज
स्वरलते विना
मौन स्वर साज. ७
देण्या अनुभुती
देवांना स्वर्गात
जाई स्वरलता
शुन्यत्व लोकात. ८
जाहले पोरके
संगीत आमुचे
स्वर लते विना
काही नसे साचे ९
पोरकी धरती
सुने ते संगीत
स्वर लते वीन
नाही ऐकवत. १०
©somadatta kulkarni
#LataMangeshkar