प्रेम तूझे कधी बरसते
होऊनिया श्रावण मास,
कधी इतके सतावते की
फिका पडावा फाल्गुन मास..
झोक्यावरती बसूनी कधी
आभाळाला कवेत घेते,
कधी रूतूनी चिखलामध्ये
धरणीमध्ये दडून जाते..
तुझ्या प्रेमाची भरती ओहोटी
कधीच का गं संपत नाही?
हृदयसागर माझा आहे
तरीही स्वातंत्र्य त्याला नाही..
असे कसे गं प्रेम तूझे हे
कसे साहावे सांग काही,
श्रावण किंवा फाल्गुनाचा
ऋतू कुठलाच सोसवत नाही!!
-----------
©BG kadam
#vacation