एका स्त्रीच्या अंतर्मनात शिरताना,
एका पुरुषाने आपलं अस्तित्व सोबत आणू नये,
त्याने शरण जावं तिच्या अस्तित्वाला,
समर्पित करावं आपल्या भावनांना तिच्यात,
तिला नको असते बढाई वस्तूंची की पैश्याची,
तिला हवं असतं भावनिक समर्पण,
तिला हवी असते शाश्वती तुमच्या असण्याची,
तिला हवी असते ओढ कधीही न सुटण्याची,
तिला हवी असते हमी नातं कधीही न तुटण्याची,
तिला हवे असता तुम्ही आणि तिच्यात तुमचं हरवून जाणं,
हे करू शकलात,
तर तुमच्या आयुष्यात असणारी प्रत्येक स्त्री,
तुमच्या नकळत तुमची झालेली असेल,
आयुष्यभरासाठी....
स्वप्नील हुद्दार
.
.
©Swapnil Huddar
#womensday2021