मातीला पावसाचं गुज कळत नाही
आणि,पावसाला मातीच गुज कळत नाही
जर , दोघांना ही एकमेकांचे गुज कळले असते
तर पावसाला माती , आणि मातीला पाऊस होता आलं असत.
जसं कोणीच कोणाची जागा घेऊ शकत नाही,
त्याच प्रमाणे कोणीच कोणाचे मन जाणुन घेऊ शकत नाही, आणि समजुन ही घेऊ शकत नाही
म्हणूनच एकांत लागतो, जवळचा वाटतो
एकांतातलं एकटेपण दुसरं काही नसतं आपल्या आतल ओळखीचं माणूस समोर येऊन बसतं
एकांताच्या मनात जेव्हा खूप तरंग उठतील,
दुर दुर हरीण सगळे तहानलेले असतील.
एकांताच्या पल्याड स्वतःला नकळत सोडून यावं !
येताना मात्र आतल्या माणसाला? सोबत घेऊन यावं.....
©Meena
#M