White बुडू लागला सूर्य, अंधाराची किती ती घाई, आली | मराठी Poetry

"White बुडू लागला सूर्य, अंधाराची किती ती घाई, आली सांजवेळ पुन्हा अन् तुझी कविता आली नाही... रोज बुडतो तो सूर्य, अंधार ही रोजचा ठरलेला, कशाला हवी कविता जर मी हात धरलेला... तुझ्या असण्याची मला, सवय व्हायला नको, कधी तू गेलासच तर, तुझी कविता जायला नको... कवितेवर इतकं प्रेम, कवीची सवय वाटते वाईट, कदाचित कळतं हे शब्दांना, उतरू लागतात ते शाईत... हेच मी म्हणते...तुझं असणं तुझी कविता खुलवते, रोज येणाऱ्या सांजवेळी, तुझ्यापाशी मला बोलावते... तू होशील माझा, काय करू तुझी कविता माझी झाली नाही ? आली सांजवेळ पुन्हा अन् तुझी कविता आली नाही... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar"

 White बुडू लागला सूर्य, अंधाराची किती ती घाई,
आली सांजवेळ पुन्हा अन् तुझी कविता आली नाही...

रोज बुडतो तो सूर्य, अंधार ही रोजचा ठरलेला,
कशाला हवी कविता जर मी हात धरलेला...

तुझ्या असण्याची मला, सवय व्हायला नको,
कधी तू गेलासच तर, तुझी कविता जायला नको...

कवितेवर इतकं प्रेम, कवीची सवय वाटते वाईट,
कदाचित कळतं हे शब्दांना, उतरू लागतात ते शाईत...

हेच मी म्हणते...तुझं असणं तुझी कविता खुलवते,
रोज येणाऱ्या सांजवेळी, तुझ्यापाशी मला बोलावते...

तू होशील माझा, काय करू तुझी कविता माझी झाली नाही ?
आली सांजवेळ पुन्हा अन् तुझी कविता आली नाही...

स्वप्नील हुद्दार










.

©Swapnil Huddar

White बुडू लागला सूर्य, अंधाराची किती ती घाई, आली सांजवेळ पुन्हा अन् तुझी कविता आली नाही... रोज बुडतो तो सूर्य, अंधार ही रोजचा ठरलेला, कशाला हवी कविता जर मी हात धरलेला... तुझ्या असण्याची मला, सवय व्हायला नको, कधी तू गेलासच तर, तुझी कविता जायला नको... कवितेवर इतकं प्रेम, कवीची सवय वाटते वाईट, कदाचित कळतं हे शब्दांना, उतरू लागतात ते शाईत... हेच मी म्हणते...तुझं असणं तुझी कविता खुलवते, रोज येणाऱ्या सांजवेळी, तुझ्यापाशी मला बोलावते... तू होशील माझा, काय करू तुझी कविता माझी झाली नाही ? आली सांजवेळ पुन्हा अन् तुझी कविता आली नाही... स्वप्नील हुद्दार . ©Swapnil Huddar

#GoodMorning

People who shared love close

More like this

Trending Topic