"प्रत्येकाने शिकावं की,
'माझं आयुष्य मी दुसऱ्यांच्या
हातात जाऊ देणार नाही,
'Emotionally आपण
इतकं मजबूत व्हावं
की,आपल्याला आपली स्वतःची
जबाबदारी घेता यायला हवी,
'कुणीतरी कौतुक करावं म्हणून
आपण काहीतरी करत असू
तर आपण संकुचित विचार करतोय
कारण जिवंतपणी कमी
आणि मेल्यानंतर जास्त कौतुक
केलं जाते,
'कोणीतरी वाईट बोलण्याचा
परिणाम जर आपण
लगेचच स्वतःवर करून घेत असणार
तर आपण जगणं विसरतोय आपलं,
'आपण करत असलेल्या कामाचा,कृतीचा,भावनेचा
आनंद आधी आपल्याला व्हावा
त्यानंतर इतरांना,
आपल्याला त्यात समाधान मिळवता आलं पाहिजे,
'जेव्हा ह्या सर्व गोष्टी
आधी आपण अमलात आणू
तेव्हा आपलं खरं जीवन जगण्याची
सुरुवात झालीये असं समजा,
तोपर्यंत आपण इतरांचा विचार करून
इतरांसाठी जगतो,
स्वतःचा अस्तित्व न ओळखता..
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
#bestfriends