White जेवढं विचार आतापर्यंत इतर गोष्टींवर केलं,
तेवढं वेळ स्वतःला दिलं असतं तर?
जेवढी वेळ इतरांना द्यायचं प्रयत्न केलं,
तेवढीच वेळ स्वतःसाठी घालवली असती तर?
जेवढे महत्व इतरांना दिलं,
तेवढेच महत्व स्वतःला दिलं असतं तर?
जेवढी आपुलकी इतरांसाठी दाखवली,
तेवढं प्रेम स्वतःवर केलं असतं तर?
जेवढे प्रयत्न नातं टिकवण्यासाठी केलं,
तेवढेच प्रयत्न स्वतः यशस्वी होण्यासाठी केलं असतं तर?
जेवढी वेळ इतरांसाठी खर्च केली,
तेवढा वेळ वाचन केलं असतं तर,
जेवढा आयुष्य इतरांना आनंदी करण्यात गेलं,
तेवढा आनंद स्वतःसाठी शोधला असतं तर?
जेवढा मान इतरांना दिलं स्वतःचा आत्मसन्मान विसरून,
तेवढा गर्व स्वतःवर केलं असतं तर?
जेवढा वेळ इतरांना भेटण्यासाठी गेला,
तेवढा वेळ एकांतात घालवला असता तर?
जेवढा प्रेम इतरांना केलं,
तेवढाच प्रेम फक्त स्वतःवर केलं असतं तर?
आज खरंच मी आनंदी असतो..
आज आशा,निराशा,अपेक्षा हे अपेक्षित नसतं..
कदाचित एक वेगळं स्थान असतं..
कुणी नसताना आनंदी असल्याचा समाधान असतं..
कदाचित इतरत्र वेळ घालवलं नसतं तर आज यशस्वी असल्याचं चित्र असतं...
असे प्रश्न कालांतराने प्रत्येकाला पडतात, ज्यांचं आयुष्य प्रत्येक गोष्टीत अर्धवट राहिलेलं असतं...
आणि तरीही लोकांचं बोलणं हेच असतं, याने काय केलं???
अहंकार तेच करतात ज्यांना काहीही न करता एक दिवस सगळंच आयतं मिळेल हे माहित असतं..
आणि त्याला कोणी असल्यानसल्याचा, आल्यागेल्याचा फरक पडत नसतो..
दुःखी तर तोच असतो जो इतरांसाठी जगत असतो..
स्वतःला एखाद्यात झोकून देऊन नेहमी अपेक्षा करत असतो..
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
#Thinking motivational thoughts images motivational thoughts on life motivational quotes in marathi