ओळखीच्या खुणां साऱ्या आज परक्या वाटल्या ओल सरतां म

"ओळखीच्या खुणां साऱ्या आज परक्या वाटल्या ओल सरतां मायेची भेगां मनांत दाटल्या।१। घालमेल उंबऱ्याची जीव झाला कासावीस सोसवेना होरपळ डोळां चातकाची आस।२। शीळ पाखरांची कानी श्रावणातला हिंदोळा घुटमळ पानोपानी गंध दरवळ वेल्हाळा।३। सये तुटलं माहेर लेकपणाला पारखी माझं फाटलं आभाळ ऊन-सावली सारखी।४। कसा आवरू हुंदका किती निरपावं पाणी कोंब खुडता उमाळा भळभळ दाटे मनी।५। नको कोरडा दिखावा वरवरचं बोलणं अंग पोळलं उन्हांत आता कुठलं शिंपण?।६। ©Shankar kamble"

 ओळखीच्या खुणां साऱ्या
आज परक्या वाटल्या
ओल सरतां मायेची
भेगां मनांत दाटल्या।१।

घालमेल उंबऱ्याची
जीव झाला कासावीस
सोसवेना होरपळ
डोळां चातकाची आस।२।

शीळ पाखरांची कानी
श्रावणातला हिंदोळा
घुटमळ पानोपानी
गंध दरवळ वेल्हाळा।३।

सये तुटलं माहेर
लेकपणाला पारखी
माझं फाटलं आभाळ
ऊन-सावली सारखी।४।

कसा आवरू हुंदका
किती निरपावं पाणी
कोंब खुडता उमाळा
भळभळ दाटे मनी।५।

नको कोरडा दिखावा
वरवरचं बोलणं
अंग पोळलं उन्हांत
आता कुठलं शिंपण?।६।

©Shankar kamble

ओळखीच्या खुणां साऱ्या आज परक्या वाटल्या ओल सरतां मायेची भेगां मनांत दाटल्या।१। घालमेल उंबऱ्याची जीव झाला कासावीस सोसवेना होरपळ डोळां चातकाची आस।२। शीळ पाखरांची कानी श्रावणातला हिंदोळा घुटमळ पानोपानी गंध दरवळ वेल्हाळा।३। सये तुटलं माहेर लेकपणाला पारखी माझं फाटलं आभाळ ऊन-सावली सारखी।४। कसा आवरू हुंदका किती निरपावं पाणी कोंब खुडता उमाळा भळभळ दाटे मनी।५। नको कोरडा दिखावा वरवरचं बोलणं अंग पोळलं उन्हांत आता कुठलं शिंपण?।६। ©Shankar kamble

#माहेर #माहेर_सासर #लेक #मुलगी #सासरी #झोका #आठवण

#Childhood

People who shared love close

More like this

Trending Topic