तिचा नेहमीचा प्रश्न,
महेश, माझ्यावर कधी लिहणार आहेस
मी स्मित हास्य करीत
लिहीन की, जरा मला लिहू वाटल्यावर
म्हणजे माझ्यावर लिहण्यासारखे
काहीच नाही का रे... अगदी दोन अक्षरही
तिचा नेहमीचा प्रश्न.. अनुत्तरीत नेहमी सारखा
खर तर ती चंद्र म्हणावी तेवढी शितल आहे
सूर्य म्हणावी तेवढी तेजस्वी आहे
अन् विशेष म्हणजे माझ्या तनमनात,
अगदी अणु रेणुत सामवलेली आहे
पण तिला मांडणे माझ्या आवाख्या बाहेर आहे
म्हणून मी प्रयत्न न करता,
हा विषय सोडून रममाण होतो
अगदी श्वासा पलिकडे, दीर्घ श्वासा अलीकडे
डोळ्यातल्या डोळ्यात, हृदयातल्या हृदयात
अगदी तुझा बनून..लिहीन प्रिये तुझ्यावर ही..!
अनेकदा..वेळ मिळाल्यावर..
- महेश
8806646250.
mdesale29999@gmail.com
©Mahesh Desale
#लव❤