ह्या काळात गोष्ट जेव्हा लग्नाची येते
तेव्हा बघितलं जातं रंग-रूप,नोकरी,शिक्षण,पैसा
आपलं सुंदर मन,स्वभाव,विचार,प्रेम
सगळं निष्फळ ठरवतं हा समाज झाला ऐसा...
मर्यादित असतं इथे फुकट प्रेम करणं
बाकी तरीही लग्न ठरवतो पैसा
जगण्यासाठी इथे पैशाला फार महत्व
समाजात हा विचार पसरला कैसा...
5 ते 10 वर्ष सोबत घालवून ही
मनात असा संकुचित विचार येतो कैसा
प्रेमाची परिभाषाच बदलवली इथे समाजाने
त्यांना प्रिय वाटतो फक्त पैसा फक्त पैसा....
©अश्लेष माडे (प्रीत कवी )
#RajaRaani