White #माझं अस्तित्व....
शब्दवेडा किशोर
माझं अस्तित्व मी पंगतीतल्या मिठासम
कायम बनवून ठेवलेलं आहे.
पंगतीतलं मिठ जसं एकदा वाढून झाल्यावर
पुन्हा येत नाही ना....??
अगदी तसाच..एक दिवस मीसुद्धा कुणाला कळणारही नाही
कधी तुमच्यातून अनाहुतपणे निघून जाईल....
पुन्हा कधीही परत न येण्यासाठी....
©शब्दवेडा किशोर
#अस्तित्वाचाशोध