साडी बाई सलोखा गोड
सुंदर दिसे साडीत नार।
वेड असतेच स्रीला तीचे
रूपरेखा ती खुलविते फार।
गजरा माळुनी केसांमध्ये
नजर वेधते सर्वां जसे।
सौंदर्याची तीच ओळख आहे
साडीत रूप तिचं फुलते खरे।
साडी नेसता सौंदर्य खुलते,
सोप्या रुपात ती दिसे मोहक।
सरळसोट पण शालीन तेज,
रूप तिचं भासे लोभस सहज।
रंग ओढतो मनास तिच्या
पदर वाऱ्याशी खेळतसे।
जिथे जाईल तिथेच सृष्टी
तिच्या साडीत रंग भरतसे।
©surajkumaregoswami