मी मेल्यावर
बोलतील ते बराच होता, मी मेल्यावर
सांगतील की खराच होता, मी मेल्यावर!
आयुष्यभरी कधी न आले, जे भेटाया
धडकतील का बरेच सारे, मी मेल्यावर?
फार चांगले करीत गेलो, ज्याचे त्याचे
आठवेल का झराच होतो, मी मेल्यावर?
राग यायचा असाच खोटा, खोटे सारे
समजतील का गराच होतो, मी मेल्यावर?
जीवनातली अखेर आता, ती सरणावर
काय फायदा शोकसभेचा, मी मेल्यावर!
® जयराम धोंगडे, नांदेड
©Jairam Dhongade
#nirasha