Year end 2023 बरंच काही सुटलेलं
मनातलं मनात साचलेलं
सारं सारं कथन करू
लिहू तयास जोमाने..!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने.!
खूप काही सोडून देऊ
कायम सारे हसत राहू
आलिंगन देऊ, सोबत राहू
साथ एकमेकांची देऊ धीराने ...!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने.!
रटाळ गाणे सोडून देऊ
गीत नवे गात राहू..
विसरून सारे वाद कालचे
नवे संवाद पेरत जाऊ..
पुढे पुढे जात राहू पुन्हा जोमाने.!
नवं पान लिहू प्रेमाने
नवं पान जगू प्रेमाने..!
©आदर्श....✍️
#YearEnd