कप्पा....
आज मी निवांत आवरायला घेतला कप्पा,
आठवायला लागला मग, आठवणींचा एकेक टप्पा....
एकेक वस्तू कप्प्यातील, उलगडत होत्या आठवणी
ज्याचे त्याचे मोल ठरती, करून पडताळणी....
गोजिरवाण्या अनेक गोष्टी जपून मी ठेवते
वापरूया परत कधीतरी, असाच विचार करते...
अडगळीच्या काही काही गोष्टी नजरेसमोर येतात
खूप जपून ठेवल्यावर, आता नकोशाच होतात....
विस्कटलेला कप्पा आता येतो जरा रुळावर
मनासारखा लागताक्षणी हसू झळके मुखावर..
मनाचाही असाच विस्कटलेला कप्पा!
असंख्य आठवणींचा गाठतो टप्पा
कधी कधी उतू जाता आठवणी
मनासी आवरू कशी त्या क्षणी?
मनाचा कप्पा, असाच विखुरलेला
यत्न करूनही, मोकाट सुटलेला..
आठवणींचा पसारा, कधी अवरतच नाही..
नव्या जुन्या सयींचा माग सुटतच नाही..
अमिता..
©Amita
#आठवणी
#MarathiKavita