वाफाळलेल्या चहा सारखं असावं आयुष्य...

चहाचा पहिला
  • Latest
  • Popular
  • Video

वाफाळलेल्या चहा सारखं असावं आयुष्य... चहाचा पहिला घोट घेताना जसा चटका बसतो तसं धडा देणार असावं आयुष्य... मग हळूहळू फुंकून वाफ बाजूला करून चहाचा घोट घेतो तसं गैरसमजाचे, संशयाचे ढग बाजूला सारून आयुष्याचा आस्वाद घेणार असावं आयुष्य... चहाचा एक एक घोट जसा चुसक्या मारत घेतो आपण तसा प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणार आणि देणार असावं आयुष्य... अद्रकच्या कडकं स्वादासारख खंबीर असावं आयुष्य...आणि साखरे सारखं सगळ्यात मिसळून गोड करणार असावं आयुष्य... आणि चहा संपताना कसा अजून प्यावासा वाटतो, तसं आयुष्य संपताना थोड अजून जगावस वाटावं असं असावं आयुष्य.... - वीणा ©Rajeshwari Ghume

#मराठीकविता #आयुष्य #वीणा #tea_and_life #tea_lover  वाफाळलेल्या चहा सारखं असावं आयुष्य...

चहाचा पहिला घोट घेताना जसा चटका बसतो तसं धडा देणार असावं आयुष्य...

मग हळूहळू फुंकून वाफ बाजूला करून चहाचा घोट घेतो तसं गैरसमजाचे, संशयाचे ढग बाजूला सारून आयुष्याचा आस्वाद घेणार असावं आयुष्य...

चहाचा एक एक घोट जसा चुसक्या मारत घेतो आपण तसा प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणार आणि देणार असावं आयुष्य...

अद्रकच्या कडकं स्वादासारख खंबीर असावं आयुष्य...आणि साखरे सारखं सगळ्यात मिसळून गोड करणार असावं आयुष्य...

आणि चहा संपताना कसा अजून प्यावासा वाटतो, तसं आयुष्य संपताना थोड अजून जगावस वाटावं असं असावं आयुष्य....

- वीणा

©Rajeshwari Ghume
Trending Topic