Unsplash मी अजून हि उभा तिथे
तू येशील या क्षणाची वाट
मन माझे पाहत होते,
जिथे पाहिलं होत तुला,
मी अजून हि उभा तिथे
कसं सांगू तुला ती भेट वेगळी होती
अवखळ पोरी समान तू वावरत होती
पाहुनी तुला मन स्थिर झाले होते
जिथे पाहिलं होत तुला,
मी अजून हि उभा तिथे
येते आठवण तुझी
क्षणात भुलतो मी स्वतःला
माझा मीचं आता राहिलो कुठे
जिथे पाहिलं होत तुला,
मी अजून हि उभा तिथे
पहायचं आहे तुला, बोलायचं आहे तुझ्याशी
गोड आठवणी बनवाव्या सोबत तुझ्याशी
तू येशील का आज इथे
जिथे पाहिलं होत तुला,
मी अजून हि उभा तिथे
©Rohit Pawar
Continue with Social Accounts
Facebook Googleor already have account Login Here