***वसुंधरा***
अनेक तुझे उपकार, वसुंधरे, अनेक तुझे उपकार
ही प्रकृती, हा जल, वायू, मृदा,
सारी तुझीच देण, वसुंधरे, सारी तुझीच देण.
उंच पर्वत, खोल दरी,झुळझुळ पाणी, मंद हवा,
घनघोर अरण्य, हिरवीगार राने,
दिसतेस किती छान, वसुंधरे, दिसतेस किती छान!
सूर्योदय-सूर्यास्ताचा हा लपंडाव,
चांदण्यांची शीतल जरतार,पक्षांचा किलबिलाट,
फुलांचा गंध दरवळतो तुझ्याच भोवती,
वाह तुझे रूप, वसुंधरे, वाह तुझे रूप!
पिकांमध्ये श्वास तुझा,फुलांमध्ये गंध तुझा,
फुलपाखरांवर रंग तुझा,पशुपक्ष्यांनाआधार तुझा,
वाह तुझे वरदान, वसुंधरे,वाह तुझे वरदान!
तुझ्यामुळेच ऋतुचक्रांचा खेळ,
साऱ्या सजीवांची तू जीवननाळ,
तुझ्यामुळेच जीवनाचे घड्याळ,
तुझ्यामुळेच स्वप्नांचे आभाळ,
तुझ्यामुळेच प्रेमाची मोहक माळ.
अनेक तुझे उपकार, वसुंधरे,
अनेक तुझे उपकार!
**************************
सौ. सुधा सुधीर बेटगेरी (बागलकोट)
©Sudha Betageri
#Sudha