शीर्षक : संक्रात आदित्याचा मकरराशीत या दिनी होताच | मराठी कविता Video

"शीर्षक : संक्रात आदित्याचा मकरराशीत या दिनी होताचं प्रवेश दक्षिणायन संपुष्टात उत्तरायण धारण वेश.....१ सुहासिनीं नटण्याचा असे साजिरा गोड सण ऊस- बोरे , तिळगुळ सुगडीचा देती वाण.....२ काळी चंद्रकळा लेवूनी नववधू सुंदर सजते हळदी कुंकू लुटूनी संक्रात मनोभावे पुजते......३ तिळ असे जरी कणभर सामावून घेण्यास समर्थ मानवा सोड मोह, वाट प्रेम जीवनास लाभेल मग अर्थ.....४ नववर्षाच्या या सणाने तिळ तिळ वाढे जसे दिस सुख समाधानात जाऊदे वर्ष हे दोन हजार चोवीस ....५ ©Harsha Patil "

शीर्षक : संक्रात आदित्याचा मकरराशीत या दिनी होताचं प्रवेश दक्षिणायन संपुष्टात उत्तरायण धारण वेश.....१ सुहासिनीं नटण्याचा असे साजिरा गोड सण ऊस- बोरे , तिळगुळ सुगडीचा देती वाण.....२ काळी चंद्रकळा लेवूनी नववधू सुंदर सजते हळदी कुंकू लुटूनी संक्रात मनोभावे पुजते......३ तिळ असे जरी कणभर सामावून घेण्यास समर्थ मानवा सोड मोह, वाट प्रेम जीवनास लाभेल मग अर्थ.....४ नववर्षाच्या या सणाने तिळ तिळ वाढे जसे दिस सुख समाधानात जाऊदे वर्ष हे दोन हजार चोवीस ....५ ©Harsha Patil

#makarsankranti

People who shared love close

More like this

Trending Topic