❤️शब्दरूपी भेट ❤️
चारोळी किंग ज्यांची ओळख
प्रत्येकाला दिला जातो सन्मान . .
असं आहे मन , सप्तरंगी
जिथे शब्दांना येतं उधाण . .
वेळोवेळी नवीन विषय घेऊन
सुंदर असते ज्यांची मांडणी . .
प्रेमळ स्वरूप असतं शब्दांच
अर्थपूर्ण असते ओळीची बांधणी. .
अश्या शाब्दिक जगातील किमयागाराला
जन्मदिनाच्या , स्नेहगंधित तोंड भरून शुभेच्छा . .
तुमची लेखणी साता समुद्रा पल्ल्याड पोहचावी
ही मोहित ची , मनोमन प्रार्थना आणि सदिच्छा. .
©Mohit Jain