आईबाप हवेत
प्रत्येकाच्या आयुष्यात आईबाप हवेत
त्यांच्या समवेत आयुष्याचे सारे दिवस जावेत
सुखदुःख नजरेसमोर त्यांच्या पहावेत
आयुष्यभर आईबाप सोबत त्यांच्या रहावेत
कौटुंबिक सुखाचे हे सुर प्रत्येक वेळी जुळावेत
आईबापाच्या आशीर्वादाने संकटांचे मार्ग वळवावेत
आईबापासाठी प्रयत्नशील हातपाय झगडावेत
त्यांच्याच अनुभवातून यशाचे हे ठसे उमटावेत
आपल्या प्रत्येक सामाजिक आणि वैयक्तिक
बाबींना त्यांच्यासमोर हळुवार मांडावेत
आईबापाच्या प्रेमाच्या गोष्टी प्रत्येकास समजावेत
प्रत्येक व्यक्तीला 'आईबापाचे' लाड कळावेत
आपुलकीचे आईबाप प्रत्येकास मिळावेत
आईबापासोबतचे होणारे वाद प्रत्येकाने टाळावेत
बंधने टाकून त्यांचे नियम ही पाळावेत
आईबापाने देखील अंधश्रद्धेसोबत
आधुनिकतेचे विचार मनी बाळगावेत
©काव्यात्मक अंकुर
#आईबापहवेत #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱 #मराठीकविता #मराठीलेखणी #MarathiKavita #marathi #nationalparentsday #poem #PARENTS मराठी कविता मराठी कविता प्रेम