नकळतपणे तुझ ते आयुष्यात येण
काही न उमगता तुझ माझ होऊन जाण
सार काही स्वप्नातील खेळ वाटतो
दूर नाही माझ्याच जवळ तुच भासतोस
भासवणारे भास तुझे ,भावनांशी खेळतात
माझे डोळे फक्त तुझ्या आठवणीत रडतात
थोड भांडतो आपण कधी कधी
गोडाला कडूचा गिलावा द्यावा लागतो अधीमधी
मान्य आहे मी खूप चिडते,राग धरुन बसते
दुसर्या सेकंदाला मन मात्र तुझ्याकडेच धावते.
💓