*२०२२ वर्ष सरतंय* ...... पण अत्याचाराचे प्रमाण दिवसंदिवस वाढतच आहे ...... असेच वर्ष जाणार ..... किती दिवस आपण असा दिलासा देणारं ...लोकांमध्ये वाढत जाणारी अलिप्तता ही देखील आज समाजाला घातक ठरत आहे."मला काय त्याचे?" असे म्हणत बघ्याची भूमिका घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळे स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे भर दिवसां एकतर्फी प्रेमातून मुले एखाद्या मुलीचा खून करतात किंवा रॉकेल,ऐसिड यासारख्या गोष्टी दिवसाढवळ्या भरवस्तीत, चौकात जेव्हा असे प्रकार घडतात . तेव्हा आम्हा सर्वांचे सामाजिक मन किती निष्ठुर झाले आहे आणि सामाजिक जाणीवा किती बधिर झाल्या आहेत, हे स्पष्ट होते. असे कृत्य करणाऱ्यास थांबवण्यास एकही व्यक्ती पुढे होत नाही, ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. अनेक निष्पाप मुलींचे प्राण जर अशा प्रकारे जात असतील तर या गोष्टींचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे.
©Anjan