"बाप"
आई हळवी नि बाप कायम असतो कठोर
हे जणू बनले आहे नेहमीचे समीकरण
आईचे अश्रू जगाला दिसतात नेहमी
पण बापाचे दिसत नाही कोणाला मन
आई असते त्यागमूर्ती मुलांना जपणारी
बापाचे दिसत नाही कुटुंबाप्रति केलेले समर्पण
आवडते त्यालाही मुलांशी गप्पा मारायला
नि त्यांच्यासोबत अल्लड होऊन जगायला छान
बाप हसऱ्या चेहऱ्याने असतो चारचौघात
कर्तव्य बजावत राहतो सदा अंगात नसताना त्राण
बापालाही द्या थोडी जागा तुमच्या व्यस्त जीवनात
मिळू द्या त्यालाही त्याच्या हक्काचा सन्मान
#बाप- एक हृदयस्पर्शी कविता
#Flute