तुझ्या मोकळ्या केसांचं गच्च आभाळ दाटलं
काठ काजळी गहिरे त्यात तुफान उठलं
श्वास थांबती मंदसा झुले मनाचा हिंदोळा
वारा खट्याळ धुंदसा घन मनाचा सावळा
चाल सावळ्या मनाची फेर धरती भोवती
लडीवाळ बट तुझी अशी अधीर सोबती
मुग्ध रेशीमस्पर्श रोमरोमात फुलती
आडखळणारे ओठ श्वास निशब्द गुंफती
शब्द मौनाचे लाजरे रान पिसाट गाठलं
तुझ्यामाझ्यातल्या वेळी दुर चांदणं सांडलं
वसु
©Vasundhara Jadhav
# दूर चांदण सांडलं#वसु#