🎊🎊सजली दिव्यांची आवळी
आज आली दिवाळी
साठवून लक्ष लक्ष आठवणी
आज आली दिवाळी 🎊🎊
सजल्या भिंती, सजले दार
सजले अंगण, सजले मन
फुटले फटाके आनंदाचे
बहरली फुलझडी रंगाची
झगमग झगमग प्रकाश पसरला
नवे कपडे,नवा उत्साह दरवळला
अंधारालाही हरवून गेला दिवा
चहुकडे पसरली आनंदी हवा
🎊🎊अशी सजली दिवाळी
अशी सजली दिवाळी
आज आली दिवाळी
आज आली दिवाळी 🎊🎊
©Sudha Betageri
#Sudha